न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माकडाने पळवलेली बॅग परत घेण्याच्या प्रयत्नात शिक्षकाचा दरीत पडून मृत्यू

नागपूर वृत्तसंस्था

सहकाऱ्याच्या मदतीसाठी धावून जाणे नागपुरातील एका शिक्षकाच्या जीवावर बेतले आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पचमढी येथे सहलीसाठी गेलेल्या सोमलवार शाळेतील शिक्षक विजय नाईक (वय ४०) यांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. सनराईज पॉइंटवर एका महिला शिक्षिकेची बॅग माकडाने हिसकावून घेतली होती. ही बॅग परत मिळवण्यासाठी नाईक यांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले; मात्र बॅग परत मिळाल्यानंतर अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते खोल दरीत कोसळले. काल शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नागपुरातील शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे