न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

Trending Now

Live Tv

जाहिराती

Live Radio

जाहिराती

गुन्हेगारी

क्रिडा

राजकीय

चित्रपट

कृषीवार्ता

जाहिराती

देश-विदेश

कोटा / वृत्तसंस्था राजस्थानमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी खचाखच भरलेली मिनी बस रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू...

नवी दिल्ली / वृत्तसंस्था कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वीच दिल्लीत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त दिसून आला. दिल्लीला जणू छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 200 आंदोलकांना...

नवी दिल्ली / वृत्तसंस्था मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात आणि निलंबनाच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. ज्ञानेश कुमारांवर...

जयपूर/ वृत्तसंस्था राजस्थानमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. नोहर येथे झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर सोमवारी एक अशी राजकीय घडामोड घडली त्यामुळे सर्वजण चकीत झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर...

...श्रीकृष्ण जन्माष्टमी लाईव्ह वृंदावन.....   https://www.youtube.com/live/-0frFsZ9IAk?si=NXQoRw-IG5Gg5g2o

नोकरी

शिक्षण

आरोग्य

आयुषच्या बाह्यरुग्ण विभागाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी/ राजू तावडे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ही ओपीडी सुरू झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना आयुष मंत्रालयाकडून मिळणारे उपचार आता सावंतवाडीतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक यांनी विशेष परिश्रम घेतले. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नवीन एक्स्टेंशन ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा व राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. शिबिरासह येत्या काळात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा येथे मिळणार आहेत. आज या शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला. याप्रसंगी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपीस्ट गौरव कुडाळकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

विज्ञान

व्यापार

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे