न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी तालुका महिला नागरी सह. पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा संपन्न

सिंधुदुर्ग राजू तावडे 

    सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ३२ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी संस्थेच्या कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

    सभेच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ. कीर्ती किशोर बोंद्रे यांनी उपस्थित सर्व सभासद व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगी व्यवस्थापकांनी सभेच्या कामकाजस सुरुवात केली.

    संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. वृंदावनी वर्णेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवून सभासदांच्या परवानगीने कायम केले. तसेच त्यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, तेरीज, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. यासोबतच आगामी सन २०२६-२७ या वर्षाच्या अंदाजपत्रकास उपस्थितांनी सर्वानुमते मान्यता दिली.

    या सभेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या कु. नेहल देवेंद्र तुळसकर व कु. नक्षत्रा गोविंद वर्णेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर संस्थेच्या अध्यक्षा सौ. कीर्ती बोंद्रे यांची कन्या कु. एकता किशोर बोंद्रे हिने एम.सी.ए. (MCA) पदविका प्राप्त केल्याबद्दल तिचाही संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान महिला सभासदांसाठी हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते.

   सभेच्या शेवटी सौ. माधुरी गोविंद वाडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला संस्थेच्या अध्यक्षा, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे