न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पहिला दिवा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी; सावंतवाडीत दिवाळीचा मंगलमय प्रारंभ!

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

    दिवाळीच्या मंगलमय प्रारंभाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडीत शौर्य, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून “पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी!” अर्पण करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी मोती तलावाच्या निसर्गरम्य काठावर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्यासमोर तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांपाशी दीपप्रज्वलन करून यंदाच्या दिवाळीचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

आपल्या आराध्य दैवताच्या चरणी पहिला दिवा अर्पण करण्याचा संकल्प यंदाही मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सावंतवाडीतील नागरिकांनी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने पूर्ण केला. मराठा समाजाचे पदाधिकारी मनोज घाटकर व प्रसाद राऊळ यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ पहिला दिवा प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात झाली; त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यांसमोर दीप अर्पण करण्यात आले.

या मंगलमय प्रसंगी अभिमन्यू लोंढे, यशराज राऊळ, बाबली राऊळ, अमोल केसरकर, राजेंद्र बिर्जे, संजय डुबळे, संजय मुक्कनवार, संजय गावठे, अरविंद सामंत, सुरेश चव्हाण, वसंत बिबवणेकर, राजन चोडणकर, सुनील खानोलकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे