न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी संघाकडे 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्ग आयोजित कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी, तालुका दोडामार्ग संघाने विजेतेपद पटकावले.‌ तर वेंगुर्ले बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता ठरला.

या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण दिवसभर ही कबड्डी स्पर्धा सावंतवाडी येथील शांतिनिकेतन स्कूलच्या पटांगणात रंगली. या स्पर्धेत एकुण ८ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना दोडामार्ग आणि वेंगुर्ला संघात रंगला. यात न्यू इंग्लिश स्कूल भेडशी संघाने २८ विरूद्ध ३२ गुण मिळवून विजेतेपदावर आपल नाव कोरले. तर बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात दोन्ही संघात चुरस पहायला मिळाली. हे कबड्डी सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी मैदानावर उपस्थित होते. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पकडसाठी तुकाराम काळे, दोडामार्ग, उत्कृष्ट चढाई प्लेविन रॉड्रिक्स, वेंगुर्ला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून संकेत सावंत, दोडामार्ग यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून सी.ए.नाईक, अजय जाधव, मयूर सुभेदार, मोहसीन शेख, मिलिंद निकम, विश्राम नाईक, वसिम शेख, अलिस्का आल्मेडा यांनी काम पाहिले.

सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड.सायली दुभाषी, स्नेहा नाईक, निता प्रासादी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर,गजानन नाटेकर, कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, माजी कबड्डीपटू तथा आयोजन प्रमुख प्रसाद देऊलकर, आर.डी.बांदेकर, युवा रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष मेहर पडते, अनिकेत पाटणकर, संदिप निवळे, ॲड.प्रसाद नाटेकर, भास्कर आमुणेकर, बाबा आल्मेडा, गौतम माठेकर, सुदिप भांबुरे,अभिषेक दळवी तसेच मोठ्या संख्येने सावंतवाडी मतदार संघातून आलेले खेळाडू उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे