न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोली घाटात आंबोलीतील डंपर चालकाची आत्महत्या

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

बेळगांव वेंगुर्ला महामार्गावर आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी ड्रोन द्वारे घाटात पाहणी केली असता त्याचा मृतदेह सुमारे बाराशे फूट खोल दरीत आढळून आला. ड्रोन कॅमेऱ्यात फक्त हात आणि पाय दिसत होता.सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे सदस्य उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, प्रथमेश गावडे यांनी खोल दरीत उतरून मृतदेह वर काढला.यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य राजु राऊळ, राकेश अमृस्कर दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे, रमेश मोहीते यांनी मृतदेह वर काढण्यास मदत केली. राजाराम याचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु पत्नी सोबत नसल्याने त्याचे काही दिवसापासून मानसिक संतुलन बिघडले होते. तशातच त्याने घाटात डंपर लावून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.राजाराम अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचा होता. त्याच्या पश्चात  आई आणि भाऊ असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटस्थळी भेट दिली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार मनिष शिंदे हे घटनास्थळी होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे