सांगली…मांगले सावर्डे रस्ता गेला वाहून
सांगली/ वृत्तसंस्था
वारणा धरण क्षेत्रासह शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीचीपाणीपातळी वाढली आहे. मांगले ते सावर्डे मार्गावरील वारणा नदीवरील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, बंधाऱ्याला जोडणारा रस्ताही पुराच्या पाण्याच्या वेगामुळे वाहून गेला आहे. दरम्यान, वारणा, कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.६ मिलिमीटर, तर सर्वाधिक ६१.२ मिलिमीटर पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे.


