न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मावळा नंतर आता धावडी गावात तीन घरांवर दरड कोसळली….

पुणे/ वृत्तसंस्था

मावळातील घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुळशी तालुक्यातील धावडी गावात तीन घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घरांमध्ये किती लोक वास्तव्यास होते, याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात असून बचाव आणि शोधकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक खचला आणि त्याखाली तीन घरे गाडली गेली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याने घरे पूर्णपणे दिसेनाशी झाली आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्याच्या भागांसाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुणे शहरासाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे