सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्यासह निवडून आलेल्या सर्व वकील नगरसेवकांचा मला अभिमान … भाजपा युवा नेते विशाल परब
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीम आयोजित पै.ॲड.अल सुहेब डिंगणकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आज सावंतवाडी जिमखाना मैदानावर करण्यात आले होते. वकिलांच्या क्रिकेट सामन्याचा आनंद आज क्रिकेट रसिकांनी लुटला. अंतिम सामन्यात सातारा क्रिकेट संघ विरुद्ध सांगली क्रिकेट संघाचा चुरशीच्या सामन्यात सातारा क्रिकेट संघ विजेता ठरला.
दरवर्षी सावंतवाडी येथे युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमद्वारे पै.ॲड.अलसुहेब डिंगणकर स्मृतीचषकाचे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी भाजपा युवा नेते तथा उद्योजक विशाल परब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल परब यांनी पै. अलसुहेब डिंगणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. २०११ पासून आपले या स्पर्धेला सहकार्य असल्याचे तसेच सावंतवाडी बार असोसीएशन सोबत आपण पुणे मुंबई येथेही स्पर्धेसाठी उपस्थित राहात होतो असे आवर्जून सांगितले. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेत चार अभ्यासू वकील नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा आनंद मला आहे असेही ते म्हणाले. उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. नीता सावंत – कविटकर,ॲड. सायली दुभाषी या विजयी नगरसेवकांचा आज इथे सत्कार करतांना होणारा आनंद हा मनापासून असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी श्री. विशाल परब यांच्यासह सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, ॲड.परिमल नाईक जिल्हाध्यक्ष वकील संघटना, ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. डी.के. गावकर, ॲड. सौ.नीता सावंत-कविटकर, ॲड.सिद्धार्थ भांबुरे, ॲड.सायली दुभाषी, मुख्य आयोजक ॲड.अनिल केसरकर. अण्णा बांदेकर यांच्यासह युनायटेड सिंधुदुर्ग क्रिकेट टीमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


