न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ठाणे ,रायगडसह नंदुरबार मध्ये अवकाळी पाऊस.. थंडी गायब

मुंबई/

निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे आणि गेल्या २४ तासांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. पुणे, मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे
रायगड जिल्ह्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसाचा सर्वाधिक फटका पेणमधील गणपती कारखान्यांना आणि वीटभट्ट्यांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या मूर्ती आणि वीटभट्ट्यांवरील विटा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाण्यातील घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात पावसाचा शिडकाव झाला. ठाणेकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे