शशिकांत शिंदेंनी करून दाखवलं; पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पवार गटाची मुसंडी
पुणे / राजू तावडे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या २०२६ च्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची मतमोजणी अत्यंत चुरशीची होत आहे. मंगळवारी दुपारी चार वाजल्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर अनेक जागांवरील कोण बाजी मारणार कोणाची आघाडी हे चित्र अस्पष्ट होते. त्यात बुधवारी दुपारी तीन वाजल्यानंतर हळूहळू या लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत गेले. महायुतीने पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर तसेच अमरावती शिक्षक मतदार संगात विजयी आघाडी घेतले. तसेच महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदार संघात विजयी आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही जागांवर आश्चर्यकारकपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात हर्षदा देशमुख जाधव यांनी 1,11,349 मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला आहे.स्मिता जाधव यांना 1,02,479 मते मिळाली आहेत. तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील मोदी यांना केवळ ३,०६६ मते पडल्याने त्यांचा दारुण पराभव झाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना विजय झाला आहे. प्रतापसिंह पाटील यांना ७३,९७३ मते मिळाली आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण ६०,८१८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर गेले. तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दिलीप घुगे यांनी ८,३६६ मते मिळाली.


