न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पोलीसांच्या मृत्युंजय दूत कार्यशाळेत रूपा मुद्राळे व हेलन निब्रे यांचा सन्मान.

 

 सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वाहतूक शाखा यांच्या मार्फत मृत्युंजय दूत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मृत्युंजय दूत यावेळी उपस्थित होते. यामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे व हेलन निब्रे या मृत्युंजय दूत महिलांचा विशेष सन्मान पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांच्या हस्ते करण्यात आला. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये या महिलांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.

या एकदिवशीय प्रशिक्षणामध्ये रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी याकरिता मृत्युंजय दूत व वाहतूक नियमन करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित डॉक्टर अमोल यांच्याकडून अपघाताप्रसंगी अपघात ग्रस्त व्यक्तीला कशाप्रकारे मदत करायची याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी मृत्युंजय दूतांना विषयी विशेष मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सनी मोरजकर, रवी जाधव व जिल्ह्यातील मृत्युंजय दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे