न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजप हा परिवार आहे, शिवसेनेतच शीतयुद्ध: भाजप प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबूरे

 

 सिंधुदुर्ग / राजू तावडे

  भाजप हा परिवार आहे. बुथ कार्यकर्ता ते पंतप्रधान हा परिवार असून सावंतवाडी नगरपरिषदेतील भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्य यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शित,उष्ण,मध्यम युद्ध नाही. अंत्योदयाचा उद्देश घेऊन आम्ही काम करत असून जनहिताच्या पलिकडे दुसरा कोणताही उद्देश आमचा नाही.खरे शितयुद्ध शिवसेनेचे नगरसेवक संजू परब व गटनेते बाबु कुडतरकर यांच्या चालू आहे.” जिसके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते!” अशा शब्दात भाजपा प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे यांनी शिवसेना नगरसेवक संजू परब यांच्या टिकेला उत्तर दिले.

मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावर टीका करताना सावंतवाडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यात शीतयुद्ध सुरू असून त्यामुळे सावंतवाडीच्या विकासाचा बट्ट्याबोळ होणार असल्याची टीका केली होती. आज बुधवारी भाजपा प्रवक्ते श्री. भांबूरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिले.

ॲड. भांबुरे म्हणाले, भाजपचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तांत्रिक मुद्यावर पत्रकार परिषद घेतली होती. कोणत्याही प्रकारे काम बंद करु असे त्यांनी म्हटले नव्हते. तर झालेल काम योग्य प्रकारे झाले की नाही याची माहिती मिळावी व होणारे काम योग्य पद्धतीने व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. यावर शिवसेना नगरसेवक संजू परब व गटनेते बाबु कुडतरकर यांनी टीका केली. खरेतर उपनगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदेवर लगेच बाबु कुडतरकर यांचे उत्तर आलेले असताना पुन्हा नगरसेवक संजू परब यांनी प्रेस का घेतली. त्यामुळे खरे शीतयुद्ध शिवसेनेतच चालू असल्याचे दिसते. नगरपरिषदेच्या सभागृहातील गटनेता जेव्हा उत्तर देतो त्यानंतर पुन्हा नगरसेवकांनी मत का मांडल ? हा प्रश्न असून शिवसेना नगरसेवकांतच खरे राजकीय शितयुद्ध सुरू आहे. तसेच सावंतवाडीचा सत्यानाश होतोय अशी विधाने करणे माजी नगराध्यक्षांना शोभत नाही. आमच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांत कोणताही वाद नाही‌. मात्र, काहीजणांकडून राजकीय स्टंट केले जात असून भाजप लोकहीतासाठी काम करतोय. निवडणूकीत जनतेचा कौल न मिळाल्याने आलेल्या पोटशोळातून काहीजण फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचे श्री. भांबूरे यांनी सांगितले. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, सभापती दिलीप भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे