हळदीचे नेरूर–पालमळई मार्गावरील साखवळी पुलाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर–पालमळई मार्गावरील ग्रा.मा. २१५, साखवळी क्र. २/३०० येथे नाबार्ड ३१ योजनेंतर्गत नवीन मोठ्या पुलाच्या पोहोचमार्गासह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
अनेक वर्षांपासूनची स्थानिक ग्रामस्थांची मागणी आता मार्गी लागली असून, येत्या १२ महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित व सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


