न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

प्रशासन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे का ? नगरसेवक सुर्याजीचा सवाल 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात झालेल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन देखील दुर्लक्ष का होत आहे ? प्रशासन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. तसेच रजिस्टर गहाळ प्रकरणी मुख्याधिकारी, पंप चालक यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी न लागल्यास शहरवासीयांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.

सावंतवाडी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातील गैरव्यवहार ,भ्रष्टाचाराबाबत सर्व पुरावे समोर असताना, रजिस्टर गहाळ असताना उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, असे असतानाही या गैरव्यवहारमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. शिवसेना सर्व नगरसेवक व नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.‌ त्यामुळे या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून होत आहे का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. तसेच रजिस्टर गहाळ प्रकरणी केवळ जोडारी यांची चौकशी करून न थांबता अहवालावर सही करणारे जबाबदार पंपचालक, विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी अन् मुख्याधिकारी यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी पोलीसांकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास शहारातील नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री.‌ सुर्याजी यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे