न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कसाल संमेलनात लेखकांना आपले पुस्तक विकण्याची संधी

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

  कसाल येथे रविवारी होणाऱ्या घुंगुरकाठी साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक यांना आपले पुस्तक विक्री करण्याची संधी ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शनाद्वारे मिळणार आहे. यासाठी आपल्या पुस्तकाच्या पाच प्रती आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक लेखक आपली पुस्तके प्रकाशित करतात. परंतु त्यांच्याकडे विक्री व्यवस्था नसते. त्यामुळे ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचत नाहीत. यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून अशी पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सिंधुदुर्गातील लेखकांच्या पुस्तकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. जे लेखक आपली पुस्तके आणतील, त्यांनी संमेलनस्थळी आयोजकांशी किंवा श्री. लक्ष्मण राठीवडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तके रसिक वाचकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे