न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नवनाथ बन…तुझी लायकी किती आणि तू बोलतोस किती ? निलेश राणे

मुंबई/ वृत्तसंस्था

शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही, असं म्हणत राणेंनी त्यांच्यावर टीका केली. ‘तुझं करिअर आत्ताच सुरू झालंय, कशाला संपवतोयस स्वतःहून?’ असा सवालही त्यांनी केला. तसंच नवनाथ बन यांनी शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती तू बोलतो किती, असा इशाराही निलेश राणे यांनी दिलाय.”

नवनाथ बन हे सातत्याने शिवसेनेवर विनाकारण आरोप करत असल्याचं निलेश राणे म्हणाले. शिंदे साहेबांवर बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही. ते भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी प्रवक्त्याचं काम करावं, असं राणेंनी सुनावलं. आम्ही भाजपच्या कोणत्याही नेत्याला निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरलेलं नाही. एखाद्या निवडणुकीत नियोजन कमी पडलं आणि त्यामुळे एखादी जागा गेली तर त्याचं आत्मपरीक्षण करायचं असतं. पण आम्ही कधीही पराभवाचं खापर एखाद्या नेत्यावर फोडलेलं नाही, असंही ते म्हणाले.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे