सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर व्यापारी व नागरिक हैराण – रूपा मुद्राळे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
गेले कित्येक दिवसापासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेच्या टाक्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. त्याचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. याचा नाहक त्रास तेथील व्यापारी, रस्त्यावरून चालणारे नागरिक व रुग्णांना होत आहे. मागच्या वर्षी अशाच समस्येमुळे ड्रेनेजचा रुग्णांना त्रास होत संडास बाथरूमची भांडी ओर फ्लो झाली होती. त्यामुळे टॉयलेटला जाण्यासाठी रुग्णांना भयंकर त्रास झाला होता. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी स्वखर्चाने सर्व टाक्या साफ करून घेतल्या होत्या. त्यानंतर सदर ड्रेनेजच्या टाक्यांची डाग – डूजी करून त्या साफ करून घेण्याची जबाबदारी हि बांधकाम विभागाची होती. कित्येक वेळा याची तक्रार देऊन सुद्धा बांधकाम विभागाला याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही असा आरोप सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील सामाजिक व राजकीय नेत्यांनी या गंभीर समस्यांवर लक्ष घालावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी केली आहे.
जे काम येथील नेते व शासन यांनी करायचे आहे ते काम रुग्णांचे हाल नको म्हणून नाईलाज आम्हाला स्वखर्चाने कराव लागत आहे हे दुर्दैव आहे, अशी खंत रूपा मुद्राळे यांनी व्यक्त केली.
पंधरा दिवसापूर्वी त्याबाबत एक निवेदन दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून ICU मधील AC बंद होते. त्याचा त्रास रुग्णांना होत होता. उपोषणाचे निवेदन देताच चार दिवसात ICU मधील एसी सुरू झाले. परंतु खालच्या ICU मधील AC अद्यापही सुरू झाले नाहीत. त्याची गंभीर दखल आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाईल, असा इशारा रूपा मुद्राळे यांनी दिला.


