न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देवगड किल्ल्याच्या खंदकातील उद्यानाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

सिंधुदुर्ग / रत्नाकर प्रभू

ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारण्यात येणाऱ्या नयनरम्य उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे विहंगम दर्शन यांचा अनोखा संगम असलेले हे उद्यान देवगडच्या पर्यटन आकर्षणात भर घालणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांना एक नवे आणि आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार असून देवगडच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

या उद्यानाच्या उभारणीमुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासह पर्यटनपूरक व्यवसायांनाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वासोबतच परिसरातील पर्यटनाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे