प्रजासत्ताक दिनी उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सिंधुदुर्ग / राजू तावडे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सादर केले. हे संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात येऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सावंतवाडी येथील सामाजिक मंदिर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. न्याय, समता आणि विचार स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया, असे यावेळी ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले. त्यानंतर या परिसरातील सहीवाशांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले.


