भाजपचे युवा नेते विशाल परब श्री देव मानसिश्वर चरणी नतमस्तक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. श्री देव मानसिश्वर देवाच्या जत्रोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत विनोद राऊळ आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन शेट्ये, दीपेश केरकर, हेमंत गावडे, श्याम कुबल आदी उपस्थित होते. या दर्शनानंतर श्री परब यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


