न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजा शिवाजी चौक मंडळाच्या वतीने समीरा खलील व रूपा मुद्राळे यांचा सन्मान.

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील व रूपा मुद्राळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राजा शिवाजी चौक मित्र मंडळ, सावंतवाडी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून या दोन रणरागिणींचा आज सत्कार केला.
याप्रसंगी राजा शिवाजी मित्रमंडळाचे सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी, डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, सौ फर्नांडिस, आशा परेरा, इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख,लक्ष्मण कदम,रवी जाधव व महिला आदी उपस्थित होत्या.
समीरा खलील व रूपा मुद्राळे या दोन रणरागिणी समाजामध्ये अतिशय तळमळीने सेवाभावी कार्य करतात. निराधार, दिव्यांग, निराधार रुग्ण तसेच संकटात असलेल्यांना सातत्याने मदत करत असतात. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामधील अपघातग्रस्तांना हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी मदत करणे, निराधारांसाठी पेन्शन योजना याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात त्या कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे