महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्कारने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित
सिंधुदुर्ग /राजू तावडे
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार आज शनिवारी मुंबई येथे अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या सौ. कांबळी या सिंधुदुर्गातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
मालवणी सम्राज्ञी म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलाना व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या कणकवली येथील अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे , मुंबई पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक ७ मार्च रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्य गृह) प्रभादेवी मुंबई येथे हा पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र मधून विविध क्षेत्रातील महिला पुरस्कारसाठी आल्या होत्या. या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी पहिल्या मानकरी ठरल्या.रोख रक्कम ,सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , मानाची शाल, सावित्रीबाईंचे पुस्तक आणि भेट वस्तु असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे .
यापूर्वीच अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार ही जाहीर झाला आहे. त्यांना मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांसाठी सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या महिला व बाल विकास अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षता कांबळी यांनी आभार मानले.


