नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या वतीने आदित्य सुभाष हळदणकर मित्रमंडळ आणि नाईक जिम, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल, भटवाडी येथे महा रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक संजू परब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आदित्य हळदणकर मित्रमंडळ व नाईक जिमच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या सहित वेंगुर्ला पंचायत समीतिचे माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, नगरसेविका लीना म्हापणकर, माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, ओरोस ब्लड बँकचे डॉ समीर मुलतानी, डॉ. पद्मा केळकर, महिला शहरप्रमुख रोहिणी सातार्डेकर, युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, सर्पमित्र तथा सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष राजाराम (आबा) चिपकर, राजेश पेडणेकर, भूषण मांजरेकर, श्रीकृष्ण कोंडूस्कर, सचिन कोंडये, प्रेरणा महिला ग्रामसंघ मठ अध्यक्ष सौ. पोतदार आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजीवनी भाजीपाला उत्पादक संघ वेतोरेच्या महिलांचा संजू परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या शिबिरात सहभागी रक्तदात्याना भेटवस्तु देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष सचिन परुळकर यांनी केले. मित्रमंडळाचे आदित्य हळदणकर, नाईक जिमचे अमित नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत, सन्मान केला. विशेष म्हणचे हा उपक्रम शिवसेनेच्या बॅनर खाली आयोजित केला असताना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल संजू परब यांनी विशेष आभार मानले. पक्षभेद बाजूला ठेऊन सामाजिक उपक्रमाला दिलेल्या सहकार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. नाईक जिमचे संचालक अमित नाईक यांनी आपल्या भाषणातून रक्तदान व आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मालवणकर बंधूंचे, रक्तदानासाठी सहकार्य करणाऱ्या रुग्णालय व रक्तपेढीच्या प्रतिनिधींचे आणि रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.


