न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपींना जामीन मंजूर

 

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

सावंतवाडी तालुक्यातील देवसू व दाणोली परिसरात अवैध दारू छाप्यादरम्यान बेकायदेशीर अग्निशस्त्रे (बंदुका), जिवंत काडतुसे तसेच खवले मांजराची खवले बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमधील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलासा देत नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींतर्फे उच्च न्यायालयात ॲड. पृथ्वीराज रावराणे व ऍड. श्रीकृष्ण गडबावले यांनी बाजू मांडली.

 

सावंतवाडी पोलिसांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी अवैध दारू साठ्याची माहिती मिळाल्यावरून देवसू व दाणोली भागात छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान दारूचा साठा मिळाला नाही; परंतु विविध ठिकाणांवरून गावठी बनावटीच्या बंदुका, जिवंत काडतुसे व संशयित खवले जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गु.र.नं. २१४/२०२६, २१५/२०२६ आणि २१६/२०२६ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती.

सदर आरोपींच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांच्यासमोर सुनावणी झाली.

 

यावेळी अर्जदारांतर्फे ॲड. पृथ्वीराज रावराणे व ॲड. श्रीकृष्ण गणबावले यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, तपास आता अंतिम टप्प्यात आला असून आरोपींची पोलीस कोठडीत अधिक काळ राहण्याची आवश्यकता नाही. तसेच या प्रकरणातील मूळ सह-आरोपींना यापूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याने समानतेच्या तत्त्वावर या अर्जदारांनाही जामीन मिळणे आवश्यक आहे. याशिवाय काही अर्जदारांवर लावण्यात आलेले आरोप केवळ सह-आरोपींच्या जबानीवर आधारलेले असून त्यांना कोणताही ठोस पुरावा जोडलेला नाही, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रमोद सोनू पालव, अशोक लक्ष्मण सावंत, गजानन उर्फ अमोल अर्जुन सावंत, संतोष विठ्ठल जाधव आणि सुरज धर्मेंद्र सावंत या सर्वांना प्रत्येकी २५,००० रुपयांच्या पी.आर. बाँडवर व अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे