न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बॉम्बने न्यायालये उडवून देण्याऱ्या भ्याड धमकीचा निषेध: वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. परिमल नाईक

 

सिंधुदूर्ग/ राजू तावडे

   महाराष्ट्रातील विविध न्यायालयांच्या अधिकृत वेबसाइटवर ई-मेलद्वारे बॉम्बने न्यायालये उडवून देण्याची भ्याड धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या भ्याड कृत्यामुळे न्यायालयीन कामकाजात विनाकारण व्यत्यय आणला जात असून, या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

आज, २ नोव्हेंबर २०२६ ला घडलेल्या या प्रकाराचा निषेध करत जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक व पदाधिकाऱ्यांनी सर्व वकील बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, अशा डरपोक कृत्यांना न घाबरता आपले न्यायालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवावे. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांना वकील संघटना घाबरणार नसून, न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे