न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बॉडी बिल्डिंगच्या मैदानात आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर निवेद शेटकरने जिंकली मने 

 

सिंधुदूर्ग /राजू तावडे 

     शरीरसौष्ठवाच्या मैदानात आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखवित बॉडी बिल्डरनी उपस्थितांची मने जिंकली. मात्र, याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब यांनीही आपल्या वक्तृत्वाचा जलवा दाखवला. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात आयोजित ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने हा क्षण अनुभवता आला. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर, बायसेप मॅन निवेद शेटकर यांच्या उपस्थितीनं उपस्थितांची मन जिंकली.

शरीराच्या सामर्थ्याची या स्पर्धेत शब्दांच्या मैदानात विशाल परब यांनी तुफानी फलंदाजी मॅच जिंकली. तब्बल नऊ मिनिटे आपल्या खास शैलीत उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा निवेदकांनी ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या दमदार भूमिकेशी करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत विशाल परब यांनी आपल्या खास शैलीत फटका मारला. विनोद राऊळ म्हणजे एक घाव दोन तुकडे करणारे नव्हेत, तर तब्बल ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते आहेत. त्यांच्या आशीर्वादाचा आणि आमच्या पाठीवर असलेल्या हाताचा आधार आम्हाला भल्याभल्यांना समोरासमोर भिडण्याचे बळ देतो असं मत व्यक्त केले.

तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या खास शैलीत उल्लेख केला. अनिल निरवडेकर म्हणजे केवळ अभिनेता अनिल कपूर नव्हेत, तर ‘नायक’ चित्रपटातील एका दिवसात मुख्यमंत्री बनलेल्या अनिल कपूर यांच्याप्रमाणेच सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. पुढील चार वर्षांत शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास घडविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडी मतदारसंघाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याची भूमिका मांडली. या स्पर्धेच्या आयोजनामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. सिंधुदुर्गातील युवकांना त्यांच्या कला, क्रीडा, कौशल्य आणि सामर्थ्याला वाव देणारी अधिकाधिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षीही अशाच भव्य स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करतानाच, आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

या दिमाखदार सोहळ्याला भाजपाचे नेते विनोद राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, विनेश तावडे, पुखराज पुरोहित, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील नागरिकांनीही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले. तर आभार नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी मानले.

दरम्यान, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडीत महोत्सव घेण्याची संकल्पना मांडली. यावेळी विशाल परब यांनी ‘भाजप महा महोत्सव’ घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. गेली ७ वर्ष सावंतवाडी नगरपरिषदेच्या पर्यटन महोत्सवापासून वंचित आहेत. मात्र, यंदा नगरपरिषदेवर लोकनियुक्त प्रतिनिधी गेल्यानं ती आशा पल्लवित झाली आहे. त्यातच विशाल परब यांनी केलेल्या भाजप महा महोत्सवाच्या घोषणेमुळे सावंतवाडीकरांना यंदा मोठी पर्वणी मिळणार असून मागील ७ वर्षांची कसूर भरून काढण्याची संधी मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे