सावंतवाडीत काँग्रेसतर्फे स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी व स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली
सिंधुदुर्ग राजू तावडे
सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी स्व. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी व स्व.सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पगुछ वाहून पुष्पाजंली अर्पण करण्यात आल
काँग्रेसच्या जडणघडणीत आणि भारत देशाच्या विकसित जडणघडणीत स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फार मोठे योगदान आहे, तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढयात स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भरीव योगदान असल्याचे मत याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, काँग्रेस सावंतवाडी तालूकाध्यक्ष अभय मालवणकर, सुनील पेडणेकर, रविंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत. या विजयामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा महापूर येण्यास सुरुवात झाली आहे असे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मतदार संघात काँग्रेस पक्षाने जागा जिंकली आहे. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेतून काँग्रेस पक्षाचे दार आता उघडलेले आहेत. यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. तसेच काँग्रेस पक्षाने आज पर्यंत जनतेच्या हितासाठी राबवलेल्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. असे श्री. राजू मसुरकर म्हणाले.
यावेळी कोल्हापूर येथील गोकूळ दूध संघावर निर्विवाद बहुमत सिद्ध करणारे कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी ॲड. दिलीप नार्वेकर, साक्षी वंजारी, राजू मसूरकर, अभय मालवणकर, सौ. सुमेधा सावंत, सुनील पेडणेकर, संजय लाड, अरुण भिसे, रविंद्र म्हापसेकर, ॲड. राघेवेद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओटवणेकर, आनंद आयरे, आकताब हेरेकर, संतोष जोईल, प्रदीप चौगुले, बाळा नमशी, प्रसाद ढवळे, संतोष तानावडे, विष्णू पेडणेकर, पिटर फर्नाडीस, सुभाष नाईक, संतोष पेडणेकर, आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.


