न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा ज्येष्ठ नागरिक मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे सर्व उमेदवार विजयी 

 सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी आज रविवारी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने सर्व ११ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत महिला गटातून निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते मिळाली. तर पुरुष गोटातून गुरुनाथ नार्वेकर आणि जगन्नाथ सातोस्कर यांनी प्रत्येकी १५४ मते मिळवली.

रविवारी झालेल्या निवडणूकीत एकूण ६३ टक्के मतदान झाले. २९२ मतदारांपैकी १८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वसाधारण गटातील नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीकडून महादेव बांदेकर (१४१), हरिश्चंद्र भिसे (१४३), उत्तम देसाई (१४३), भिकाजी धुरी (१३६), हनुमंत मालवणकर (१४४), गुरुनाथ नार्वेकर (१५४), जगन्नाथ सातोस्कर (१५४), प्रकाश शिर्के (१४२) आणि महादेव वसकर (१४२) यांनी मते मिळवली. अपक्ष उमेदवारांमध्ये महादेव सावंत यांना ५९, सुकाजी गावडे यांना ४५ आणि अशोक परब यांना ३३ मते मिळाली.

महिला राखीव गटात निकिता मोरजकर यांनी १५५, तर अर्चना सावंत यांनी १४९ मते मिळवून विजय संपादन केला. अपक्ष उमेदवार अनुराधा मोर्ये यांना ३३ मते मिळाली. सर्वसाधारण गटातील १७, तर महिला गटातील १२ मते बाद ठरली. सर्व विजयी उमेदवारांचे मावळते अध्यक्ष श्री. अन्वर खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नवीन कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पृथ्वीराज बांदेकर यांनी काम पाहिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे