कोमसापच्या ‘ संत शिरोमणी ‘ निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर दिव्यल गावडे हिला प्रथम क्रमांक
सिंधुदुर्ग /राजू तावडे
कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेकडून मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक आणि महान पुरस्कर्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (सप्तशतकोत्तर) ७५१ व्या जयंती निमित्ताने ‘संत शिरोमणी’ निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या प्रशालेची दिव्यल गावडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. सावंतवाडी तालुका मर्यादीत या स्पर्धेत प्रथम क्रमांक नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या
दिव्यल दिनेश गावडे , द्वितीय नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली दूर्वा वासुदेव नाईक, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नंबर १ वेदिका कृष्णा पंडीत हीने प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिके मिलाग्रीस हायस्कूलची रिया सचिन चव्हाण, मदर क्वीन्स हायस्कूलचा श्रेयस हेमंत रेडकर, माध्यमिक विद्यालय नेमळेची जिज्ञेशा कमलेश भैरे यांना प्राप्त झालीत. स्पर्धेचे परीक्षण मालवण कोमसाप शाखेच्या सदस्या श्रीमती आदिती मसुरकर यांनी केले. सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीकडून अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्पर्धेचे बक्षीस वितरण कोमसाप सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय तुतारी कविसंमेलनाच्या वेळी होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष दीपक पटेकर यांनी दिली.


