न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आगीत जळलेल्या शेर्ले येथील धुरी यांच्या दुकानाची पालकमंत्री नितेश राणेंकडून पाहणी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

   आगीत जळून खाक झालेल्या शेर्ले दुकानवाडी येथील अशोक धुरी यांच्या दुकानाची पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगून धुरी कुटुंबीयांना मोठा धीर दिला. त्याचप्रमाणे शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिले.

मागील आठवड्यात शॉर्टसर्किटमुळे शेर्ले-दुकानवाडी येथील धुरी यांच्या किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेची दखल घेत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. धुरी कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर दिला, तसेच शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानांचे चार गाळे, चार गोडाऊन खोल्या, किराणा साहित्य, भुसार माल व अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आगीची तीव्रता मोठी असल्याने दुकानातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, या दुर्घटनानेमुळे धुरी कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दुकानाचा विमा नसल्याने धुरी कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी यांनी पालकमंत्री राणे यांना आगीत झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती दिली. धुरी कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची बाब लक्षात घेऊन शासनामार्फत त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे धुरी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी उपसरपंच दीपक नाईक, बांदा माजी शहर अध्यक्ष बाबा काणेकर, युवा मोर्चाचे सिद्धेश कांबळी, अक्षय परब, अजित शेर्लेकर, गौरांग शेर्लेकर, राजेश चव्हाण, युवा सेना तालुकाध्यक्ष प्रशांत जाधव, तात्या पावसकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे