न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोलीत महादेव गड प्वाईंटवर पर्यटक दरीत कोसळला

सिंधुदुर्ग/  राजू तावडे

 आंबोली महादेव गड पॉईंट येथून पर्यटक दरीत कोसळला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कर्नाटक राज्यातील निपाणी येथील आयुब सय्यद नामक तरूण. सुमारे 400 फुट खोल दरीत कोसळला असून पोलिस स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत.

मात्र उशिरापर्यंत हा तरूण सापडला नव्हता तसेच रात्रीचा अंधार व कडक धुके असल्याने शोधकार्यात मोठा अडथळा येत होता. उशिरापर्यंत पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.दरम्यान, सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, संबंधित पर्यटक खोल दरीत कोसळल्याने व पाऊस अन् काळोख झाल्याने ही मोहीम उद्या सकाळी ६ वा. सुरू करण्यात येणार आहे.

आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. संबंधित पर्यटक हा निपाणी येथील असल्याचे समोर येत असून आयुब सय्यद हे पेशाने डॉक्टर असल्याची माहिती मिळत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर महादेव गड परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम संतोष गलाले यांच्यासह कर्मचारी घटनास्थळावर ठाण मांडून येतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे