न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन

मुंबई / वृत्तसंस्था

बॉलिवूड तसंच साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’गजनी’, ‘लगान’ आणि ‘सरफरोश’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयानं इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रावत यांच्या निधनानं सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

प्रदीप रावत यांनी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.मिळालेल्या माहितीनुसार त्यांची कर्करोगाशी सुरू झुंज सुरू होती. रक्ताचा कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगेळ्या छाटणीच्या भूमिका साकारल्या.बी. आर. चोप्रांचे ‘महाभारत’ या मालिकेत त्यांनी अश्वत्थामा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारून घराघरांत ओळख मिळवली.

आमिर खानच्या ‘लगान’मधील देवा, ‘सरफरोश’मधील सुल्तान या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. प्रदीप रावत यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला तो म्हणजे गजनी चित्रपट. ए. आर. मुरुगदोस दिग्दर्शित २००५ मधील तमिळ ‘गजनी’ (ज्यात सूर्या मुख्य भूमिकेत होता) आणि २००८ मधील हिंदी रीमेक ‘गजिनी’ (ज्यात आमिर खान होता) या दोन्ही चित्रपटांत त्यांनी ‘गजिनी धर्मात्मा’ हा मुख्य खलनायक साकारला. आजही त्यांना गजनी म्हणूनच ओळखलं जात असे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे