न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजस्थानात टॅम्पो ट्रॅव्हलर नाल्यात कोसळून आठ जणांचा मृत्यू

कोटा / वृत्तसंस्था

राजस्थानमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी खचाखच भरलेली मिनी बस रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये २५ हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कोटा जिल्ह्यातील सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारी मिनी बस अचानक रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. ही बस सुमारे १५ फूट उंचीवरून खाली पडल्याची माहिती आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे