कराडजवळ अपघातात खटाव तालुक्यातील चौघा मित्रांचा मृत्यू
सातारा/ वृत्तसंस्था
साताऱ्यात कराडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री 11 वाजता कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात 4 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मित्र हे कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून घरी परतत असताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. यात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली आहे.


