कितीही चोर आले तरीही आपला भगवा आणि ओळख कोण चोरू शकत नाही:, उध्दव ठाकरे
मुंबई/ वृत्तसंस्था
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही हाच भगवा फडकवण्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट अतिशय आक्राळ-विक्राळ रूप धारण करणार असल्याचा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी वर्गाच्या दयनीय स्थितीवरून सरकारला तीव्र शब्दांत धारेवर धरले. नुकत्याच दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर बोट ठेवत, हे उपकार नाही तर शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे, असा घणाघात त्यांनी के
पिकांचे पंचनामे, रखडलेली कर्जमाफी, अपूर्ण नमो किसान योजना आणि कागदावरच फिरणाऱ्या केंद्रीय पथकावरून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.”
ते म्हणाले की, अतिवृष्टीवेळी सर्वात मोठं पॅकेज असं मुख्यमंत्री म्हणाले होते. नमो किसान योजनेचे ३ हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडावर ५ हजार रुपये फेकून मारले. सहलीला पैसे नाहीत म्हणून एका मुलाने आत्महत्या केली. हे सरकार केवळ घोषणा करत आहे. कर्जमाफी जाहीर केली, पण किती जणांना मदत केली?


