न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वेर्ले गावाचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा ; फौजदारवाडी-लिंगवतवाडीच्या एकजुटीतून स्वनिधीतून बस स्टॉप उभारणी – तहसीलदार श्रीधर पाटील

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडीच्या   वेर्ले गावाचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, अशी एकी आणि एकजूट या गावात आहे. या गावातील फौजदारवाडी आणि लिंगवतवाडी या दोन्ही वाड्यातील तरुणांपासून महिला, वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी एकत्र येत अनेक समाजोपयोगी कामे स्वनिधीतून उभारली आहेत. बस स्टॉप उभारून त्यांनी एकतेचे प्रतीक दाखवून दिले आहे, अशा शब्दात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले.

वेर्ले फौजदारवाडी, लिंगवतवाडी येथे बस स्टॉप थांबा जवळपास एक लाख रुपयांची देणगी व लोकांच्या मदतीच्या माध्यमातून लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या बस स्टॉपचा लोकार्पण सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव अॅड. संतोष सावंत, सरपंच रुचिता राऊळ, ग्रामपंचायत सदस्य तथा बस स्टॉप उभारणीत पुढाकार घेतलेले बाळू गावडे, वेर्ले – गोविंद उर्फ दादा लिंगवत, लाडजी राऊळ, सोमनाथ राऊळ, माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, श्रीमती लक्ष्मी विश्राम राऊळ, अनिल लिंगवत, विश्राम लिंगवत, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. सौ. लिंगवत, सतीश लिंगवत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला गोसावी, ममता राऊळ, वेर्ले सोसायटी चेअरमन विजय राऊळ, विठ्ठल राऊळ, बापू राऊळ, तलाठी प्रवीण फोले, प्रमोद नाईक, पांडुरंग राऊळ, सुरेश गावडे, तुकाराम गावडे, भानूदास सावंत, अशोक राऊळ, महादेव मोरजकर, श्रीधर राऊळ, झीलू राऊळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी या बस स्टॉपसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या श्रीमती द्वारका लिंगवत व श्री विश्राम लिंगवत या दोन्ही दानशूर व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तहसीलदार श्रीधर पाटील, अॅड. संतोष सावंत, गोविंद लिंगवत, लाडजी राऊळ, बाळू गावडे, सरपंच रुचिता राऊळ आदींचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे. या गावात मोठ्या संख्येने जवळपास साडे सोळा हजार व्यक्ती आहेत, तसेच या भागात आतापर्यंत ७३ हेक्टर भागातील शेती पंचनामे झाले आहेत. या गावातील लोकांनी रस्त्यासाठी तसेच विविध कामांसाठी लोकसहभागातून उभारणी केली आहे. शासनाच्या निधीची वाट न बघता लोकसहभाग व एकोप्यातून खूप काही करता येते, ‘गाव करील ते राव काय करील’ हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा गाव निसर्गरम्य आदर्श गाव असून गावातील लोकांनी बंधाऱ्यांचे कामही उत्कृष्ट केले आहे.

यावेळी अॅड. संतोष सावंत म्हणाले, या गावाचा आदर्श एकोपा आणि एकसंघपणाचा आहे. या गावाने दारूबंदी असो किंवा रस्ते, पाणी, वीज त्याचबरोबर सामाजिक तसेच आध्यात्मिक, समाजहिताचे उपक्रम एकजुटीने राबवले आहेत. दशक्रोशीत हा गाव एकोप्यासाठी प्रसिद्ध आहे, या गावाने अशीच एकी कायम ठेवावी.

यावेळी प्रास्ताविक डॉ. संजीव लिंगवत यांनी केले तर सूत्रसंचालन श्री गोसावी यांनी केले.

यावेळी सुहासिनी राऊळ, देवकी वासूदेव राऊळ, महेश राऊळ, अनिल केसरकल, गोपाळ घोगळे, पार्वती घोगळे, बुधाजी घोगळे, अनिल गावडे, दिलीप घोगळे, न्हानू बांदेकर, ज्ञानेश्वर गावडे, वैष्णवी सतीश लिंगवत, सुभद्रा राऊळ, गुणाजी राऊळ, मोहन राऊळ, सहदेव राऊळ, सुरेखा राऊळ, सुनिता राऊळ, रामचंद्र सावंत, इंदिरा खानोलकर, सत्यवान राऊळ, संजय भगवान राऊळ, रामकृष्ण राऊळ, शांताराम राऊळ, प्रकाश मोरजकर, नारायण राऊळ, सत्यवान सावंत, वसंत मोरजकर, यशोदा साटम, सुनील राघो राऊळ, शशिकांत घाडी, वसंत राऊळ, संजय घाडी, यश घाडी, राकेश घाडी, विलास लिंगवत, सुनील गावडे, महेश लिंगवत, संतोष लिंगवत, जानदेव लिंगवत, बाळू गोसावी, मधुकर लिंगवत, शिवराम लिंगवत, अनिकेत लिंगवत, विजय गोसावी, प्राज्योत गोसावी, भरत गोसावी, आत्माराम गोसावी, राम लिंगवत, अर्जुन मोरजकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री पाटील यांनी फार्मर आयडी तसेच पीक पाहणी, सामायिक जमीन संदर्भात मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे