पत्रादेवी दुचाकी अपघातात सरमळेतील व्यक्ती ठार
पेडणे/ प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर पत्रा देवी नवीन टोलनाक्याजवळ दोन दुचाकी अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरमळे गावातील मंगेश गावडे नामक व्यक्ती ठार झाला आहे…तर ओटवणेतील युवक गंंभीर जखमी झाला.. इंडियन ऑईल पंपासमोर रस्ता ओलांडताना हा अपघात रात्री ११.४५ चया सुमारास झाला.


