ऊस दरवाढ आंदोलन… कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेचे हाल
बेळगांव / गजानन बांदेकर
उसाला इथेनॉलचा जादा दर मिळावा तसेच अन्य मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले महाराष्ट्रातील आंदोलन तसेच कर्नाटकातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला वाढवलेली व्याप्ती यांचा फटका आज सामान्य जनतेला बसला… विद्यार्थ्यांचे हालही एस.टी. बस सेवा बंद असल्याने झाले…
काल पर्यंत निवडक महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनाने आज दुपारनंतर ग्रामीण भागातील रस्त्यांवर बंदचा मोर्चा वळविला… अचानक झालेल्या बंद मुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झालेत… रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच आहे… महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूरसह कर्नाटकात संकेश्वर, हुक्केरी, निपाणी, चिकोडी, कब्बूल, महालिंगपूरम, मुधोळ, अथणी, कोल्हार, मंटूर, आहे विजापूर आधी अनेक ठिकाणी सुरू आहे.


