न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चराठे येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यास सुरुवात

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

चराठे येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून लोकसहभागाच्या माध्यमातून गुरुवारी वनराई बंधारा बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व कच्चे बंधारे यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची ‘पालकमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चराठे गावासाठी पालकमित्र म्हणून वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी चराठे गावच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, वनरक्षक सुशांत चोथे, अक्षय कुंभार तसेच इतर वनकर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या अशा वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास, जमिनीतील ओलावा टिकविण्यास तसेच शेती व परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे.

‘लोकसहभागातून जलसंधारण, जलसंधारणातून समृद्ध गाव’ या संकल्पनेतून वनविभाग व ग्रामस्थांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चराठे गावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे