गोकुळात महायुतीला सतेज पाटलांचा दणका..१४ जागांवर आघाडी…
कोल्हापूर/ प्रतिनिधी
मतं घालण्यासाठी देवांच्या शपथी घालण्या इतपत थराला गेलेल्या कोल्हापूर सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या (गोकुळ) निवडणुकीत मतदारांनी महायुतीला चपराक दिली आहे… २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटीलांना १४ जागांवर आघाडी मिळाली असून महायुतीला ११ जागांवर आघाडी मिळाली आहे… हसन मुश्रीफ यांच्या मुलावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे…


