न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विद्याधर भागवत व सी.श्री. उपाध्ये यांनी नवोदितांना घडविले: सतीश पाटणकर

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे 

   आपल्या जिल्ह्यातील प्रतिभेचे अलौकिक लेणे लाभलेले साहित्यिक व महान कवी आरती प्रभूंचे स्मारक म्हणून चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था स्थापन करून विद्याधर भागवत आणि सी. श्री. उपाध्ये अनेकांना लिहिते करुन नवोदित घडवले, असे उद्गार ज्येष्ठ लेखक व मालवणी कला, संस्कृतीचे अभ्यासक सतीश पाटणकर यांनी काढले.

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात भागवत- उपाध्ये यांचे साहित्य : स्वरूप व परिचय हा परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी सतीश पाटणकर बोलत होते. भागवत कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि श्री. शंकर प्रभू, रवींद्र भागवत उपस्थित होते. या कार्यक्रमात दहा अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले.

श्री. पाटणकर म्हणाले की, या दोघांनी नवोदितांचे लेखन प्रकाशित केले. पदरमोड करत ‘आरती’ मासिक सुरु करून नवोदितांना लेखन प्रकाशनाची वाट सुकर केली व आपणही कथा, कविता व कादंबरी लेखन करून कोकणी निसर्ग व माणसांचे जीवन चित्रण केले. मालवणी मुलखात शिक्षकी पेशा स्विकारून आपल्या मातीशी इनाम राखुन साहित्य उपासना, सेवा करणे हेच त्यांचे जीवन ध्येय होते. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी व कविवर्य वसंत सावंत यांनी प्रेरणा दिली. त्यांचे हे कार्य चिरस्मरणीय आहे. या दृष्टीने हा उपक्रम फारच महत्वाचा आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘साहित्यिक उपक्रमांना अलिकडे उपस्थिती कमी मिळते. पण या परिसंवादाच्या निमित्ताने चंदगड, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली येथील निबंधवाचक उपस्थित आहेत, जे बीज आपल्या तत्कालीन साहित्यक्षेत्रातील वडिलधाऱ्यांनी पेरले होते, त्याला मिळालेले हे यश आहे. पुणे विद्यापीठात भागवत सरांच्या लेखनावर संशोधन पदवी मिळते, हा विद्याधर भागवत सरांचा गौरव आहे. या दोन्हीं लेखकांवर आज होणारी साहित्यिक चर्चा पुढील काळात मैलाचा दगड ठरेल व कोकणातील प्रत्येक कलावंत, लेखक, कवी यांच्या जीवनकार्यावर असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुरवातीला शंकर प्रभू यांनी भागवत सरांच्या काही कवींच्या सादर केल्या. श्रिया भागवत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर बाळकृष्ण लळीत यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. या परिसंवादात स्मिता शेटकर, अंजली मुतालिक, रवींद्र भागवत. श्वेतल परब, श्रिया भागवत, सुरेखा चव्हाण, बाळकृष्ण लळीत यांनी निबंध सादर केले. यावेळी विठ्ठल कदम,बाळ पुराणिक, रवींद्र ओगले, साधना तेंडुलकर, प्रा. भाऊ गोसावी, मयुर गवळी, विनायक महाबळ, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत व अन्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजक रवींद्र भागवत यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे