पत्रकार सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी साई पुण्यतिथीचे आयोजन… साई भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडीत न्यू सबनीसवाडा, बिरोडकर टेंब येथील जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सालाबादप्रमाणे साईबाबा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व साईभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहावेअसे भावपूर्ण आवाहन गावडे कुटुंबीयांच्या वतीने करण्य
साईबाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या उत्सवात दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ४ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना तीर्थप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने साईभक्तांनी एकत्र येऊन साईबाबांचे दर्शन घ्यावे आणि उत्सवात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या उत्सवाचे आयोजन सीताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे आणि साईश गावडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. रामकृष्ण, प्रकाश, संतोष, सौ. रश्मी, प्रज्ञा, सिद्धी, उदय, संदीप, प्रथमेश, सागर, साहिल, जावई,श्री सुधीर,प्रशांत,सौ. योगिता, सौ. पवित्रा, सौ. सानिका, सौ. सुविधा, कु. सुचिता, कु. संकेत, अंश, परी आणि स्वानंदी यांच्यासह समस्त गावडे कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्रमंडळी या उत्सवाचे निमंत्रक आहेत.


