महिलांच्या योजनांना कात्री…
मुंबई/ वृत्तसंस्था
काही योजनांवर खर्च कमी होत असल्याचे, तर काहींसाठी निधीची कमी मागणी किंवा योजनांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यातील काही योजना बंद झाल्या असून, काही टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत.महिलांसाठी बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे, महिला मंडळांना अनुदान, देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी साह्य, वीज नसलेल्या अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जा संच, माझी कन्या भाग्यश्री योजना,अनाथ झालेल्या बालकांसाठी आर्थिक मदत या योजनांना घरघर लागली आहे


