न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अखेर सुधाताई कामत शाळेच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला… आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

सावंतवाडी येथील कै. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक ‘पीएम श्री’ शाळा सावंतवाडी नंबर २ च्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

या सोहळ्याप्रसंगी माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शाळेच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडली. सुधाताई कामत शाळेची देखणी आणि भव्य इमारत लवकरात लवकर उभी राहावी, यासाठी सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण व निमशहरी भागातील शैक्षणिक दर्जात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणि अन्य सुविधांची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार केसरकर यांनी दिली.

यावेळी त्यांनी उपस्थितांना दसरा व दिवाळी सणाच्या शुभेच्छाही दिल्या. नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे