कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे
कोल्हापूर/ वृत्तसंस्था
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून, सर्वसाधारण गटातील २० पैकी तब्बल १७ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे ३ उमेदवार देखील या लढतीत टिकून असून आघाडीवर आहेत. यामध्ये समविचारी आघाडीकडून अभिजित टायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर आणि राहुल देसाई हे तीन प्रमुख उमेदवार आगेकूच करत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांवरून राजकीय वातावरण तापले असून, गोकुळच्या सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये अत्यंत अटीतटीची पाहायला मिळत आहे.”


