शिर्डीत साई पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात
अहिल्या नगर/ प्रतिनिधी
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पोथी घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अविनाश कुलकर्णी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


