कास धरण ओव्हरफ्लो होऊनही सातारा तहानलेला
सातारा / वृत्तसंस्था
कास धरण पूर्ण भरलेले असतानाही सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रहिवाशांनी पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.


