न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर, “दाणोलीश्वर” चित्रपटाचं पोस्टर लाँच

सिंधुदुर्ग  /  राजू तावडे 

   कोकणभूमीत सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ असे या चित्रपटाचे नाव असून, प्रेक्षकांना अध्यात्माचा परिपूर्ण अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

महाकाली प्रॉडक्शन, स्मिता क्रिएशन यांनी दाणोलीश्वर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत, स्मिता घाग चित्रपटाचे निर्माता, रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माता आहेत. कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या “दाणोलीश्र्वर” या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे. विराज राजे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. प्राप्त:स्मरणीय सद्गुरु चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस), प.पू.बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांच्या आशीर्वादाने व दाणोली समाधी मंदिर ट्रस्ट विश्वस्त कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत खेमराज शिवरामराजे सावंत भोसले, दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे या चित्रपटासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

समर्थ शंकर साटम महाराजांचा जन्म १८८४ साली अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीसारखा सुरू झालेला त्यांचा प्रवास अलौकिक ठरला. भारतभ्रमण करून त्यांची आध्यात्मिक पावले कोकणातील पावन भूमीकडे वळली. सावंतवाडी जवळील दाणोली या गावात महाराजांचा हा दिव्य प्रवास स्थिरावला. सन १९३७ पर्यंत त्यांनी आपल्या वास्तव्यात अनेक लीला आणि चमत्कार घडवले. संकटात सापडलेल्या लाखो भाविकांचे प्रपंच सावरून त्यांना सन्मार्ग दाखवला. आपल्या सहज वागण्यातून समाजाला मानवी जीवनाचे अंतिम सार, मूल्ये शिकवली. दाणोली नगरीत समाधी घेऊन त्यांनी ही भूमी कायमस्वरूपी पावन करून ठेवली. साटम महाराजांची अथांग शिकवण आणि जीवनगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दाणोलीश्वर या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विराज राजे यांनी सांगितले.

साटम महाराजांची मुख्य भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. आजवर साधू-संत, दैवी शक्ती असलेल्या व्यक्तीमत्त्वांवर मराठीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले. त्यात आता दाणोलीश्वर साटम महाराजांवरील चित्रपटाची भर पडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे