मध्यरात्री MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर
पुणे/ प्रतिनिधी
अखेर ११ दिवसांचे एमपीएसी विद्यार्थ्यांचे आंदोलन मध्यरात्री स्थगित करण्यात आलं. एमपीएससी परीक्षामधील गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचा आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी रजेवर जाण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मध्यरात्री चर्चा झाली. त्यानंतर भीमनवार यांनी रजेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलन संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पोलिसांचं टाळ्या वाजून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले


